16 जानेवारी : ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि दलित पॅथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणारे. दादरमधल्या चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी त्यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईतल्या वडाळामधल्या आंबेडकर कॉलेजमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यांच्या अंत्यादर्शनासाठी राज्याभरातून उपस्थित राहणारे त्यांच समर्थक आणि नेत्यांची सुरक्षता लक्षत घेतं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नामदेव ढसळ यांचं काल पहाटे 4 वाजता निधन झालं होतं. त्यांच्या साहित्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्रीची पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात ढसाळांचं स्थान फार महत्वाचं होतं.