IPS अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

IPS अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

  • Share this:

mha police15 जानेवारी : राज्यातील पोलीस अधिकार्‍यांची बदली मंत्र्यांच्या वादामुळे अडकून पडली होती अखेर यावर तोडगा निघाला आहे. आज(बुधवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतले.

त्यासाठी पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या कायद्यात बदल केला जाणार आहे त्यासंबंधीचा वटहुकूम लवकरच काढला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतलेल्या निर्णयानुसार, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असतील तर डीवायएसपी आणि एसपी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार गृहमंत्र्यांकडे राहतील.

यापुढे 2 वर्षांनंतर पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. सध्या ही मर्यादा तीन वर्षं इतकी आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून मुख्मयंत्री आणि गृहमंत्र्यांमधला वाद उघड्यावर आला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी मात्र,25 डिसेंबर रोजी बदल्यांच्या कायद्यात होत असलेल्या या बदलाला विरोध केला होता. अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना दिले तर, महाराष्ट्रात आंदोलन सुरू करू असा इशारा अण्णांनी दिला होता.

First published: January 15, 2014, 10:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading