हातेकरांनी घेतला विद्यापीठाच्या गेटवर वर्ग

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2014 08:48 PM IST

हातेकरांनी घेतला विद्यापीठाच्या गेटवर वर्ग

hatekar 45314 जानेवारी : आपल्या निलंबनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डॉ. नीरज हातेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ कलिना कँपसच्या गेटबाहेर इकोनॉमिक्सचा क्लास घेतला. दुपारी 3 ते 5 या दरम्यान हा क्लास झाला.

आपल्या निलंबनामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवणं शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन हा क्लास घेतला असल्याचं हातेकरांनी सांगितलंय. या वर्गाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी शाहीर संभाजी भगत आणि लोकभारतीचे आमदार कपील पाटील यांनी उपस्थित राहुन आपला पाठिंबा दर्शवला.

हातेकर यांना कोणतीही नोटीस न बजावता निलंबन करण्यात आलंय. विद्यार्थी प्रिय हातेकरांवर कारवाई झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. या प्रकरणी अखेर निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत हातेकरांचं निलंबन कायम राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2014 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...