आयआरबीला पैसे कोण देणार?

आयआरबीला पैसे कोण देणार?

  • Share this:

IRB14 जानेवारी : कोल्हापूरमधला टोलवसुलीचा वाद सध्या शमला आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी टोल बंद ठेवण्याचे आदेश आयआरबी कंपनीला दिला आहे. त्यामुळे सध्या आंदोलनाची धग थंड झाली असली तरी प्रकल्पाच्या पुनर्मूल्यांकनानंतर आयआरबीचे पैसै कोणी भरायचे हा कळीचा मुद्दा असणार आहे.

मंत्र्यांनी महापालिका पैसे भरणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी महापालिकेचं बजेट कमी असल्याने याला शिवसेनेने विरोध केला आहे. दरम्यान उद्या कोल्हापूरचे दोनही मंत्री मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. आयआरबीच्या पैशांसंदर्भातला निर्णय गुरुवारी होणार्‍या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे.

First published: January 14, 2014, 10:53 AM IST

ताज्या बातम्या