मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार -सोमय्या

मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार -सोमय्या

  • Share this:

kirit somiya45413 जानेवारी : मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून पडून सतरा वर्षांच्या मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात तुटल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र तिच्यावर उपचारांसाठी कोणतीही वैद्यकीय सोय नसल्यानं उपचारात दिरंगाई होत आहे. या प्रकरणी रेल्वे अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कांजुरमार्ग ते घाटकोपर या रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढला.

मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी रेल्वे प्रशासनावर कारवाईचीही मागणी केली. शनिवारी घाटकोपर एसएनडीटी कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी मोनिका मोरे ही विद्यार्थिनी शनिवारी कॉलेजमधून घरी निघाली.

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म नंबर 2 पोहचल्यानंतर तिने लोकल पकडण्यासाठी धाव घेतली पण लोकलमध्ये चढल्यानंतर तिचा तोल गेला आणि ती खड्‌ड्यात पडली. यावेळी तिचे दोन्ही हात लोकलखाली आले या दुर्घटनेत तिचे दोन्ही हात तुटले. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या प्लॅटफार्म नंबर 2 वर महिलांच्या डब्यासमोर रेल्वेने सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी खड्डा खणला. पण, हा खड्डा खणल्यानंतर वेळेवर बुजवण्यात आला नाही.

First Published: Jan 13, 2014 09:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading