शिवसेनेचा 23 जानेवारीला प्रतिज्ञा दिन

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2014 04:11 PM IST

Image udhav_on_karnatak_election_300x255.jpg13 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच निमित्तसाधून 23 जानेवारीला मुंबईमध्ये शिवबंधनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. निवडणुका जिंकण्याच्याच विश्वासाने शिवसेना आता मैदानात उतरणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी या वेळी सांगितलं.

23 तारखेला दुपारी 2 वाजता सोमय्या ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार असून या दिवशी राज्याभरातील शिवसैनिक एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा करतील असंही उद्धव यांनी सांगितलं. या कार्यक्रमात युतीचे घटक पक्ष सहभागी होतील का असा प्रश्न विचारला असता. उद्धव म्हणाले की, हा कार्यक्रम म्हणजे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही बाळासाहेबांच्या जन्मदिनी प्रतिज्ञा करणार आहोत त्यामुळे ज्याना येऊ वाटले ते येऊ शकता अशी कोणतीही बंधंन नाही असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, धमक्या आणि अश्लील फोन येणार्‍या शिवसेनेच्या नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी अजूनही भेट दिली नाही. त्यामुळेच की काय या नगरसेविकांना सोशल नेटवकीर्ंग साईटवरुन जनाधार गोळा करावा लागतोय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही तीन वेळा भेटण्यासाठी वेळ देऊन नतंर ती भेट नाकारली. यावर उद्धव यांना सवाल विचारला असता हा पक्षातला अंतर्गत मुद्दा असून माध्यमांनी याबाबत चिंता करू नये आम्ही पाहुन घेऊ असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2014 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...