News18 Lokmat

दै.सामनाच्या अग्रलेखातून खोब्रागडेंचा समाचार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2014 09:34 PM IST

uttam khobragade13 जानेवारी :   माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांचा आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी देवयानी खोब्रागडे यांच्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात "तुम्ही इतके नियम पाळणारे आहात, मग आदर्शमध्ये तुमचा फ्लॅट कसा", असं जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी मराठी मीडियावर जातीयवादाचा आरोप केला. सामनात खोब्रागडेंच्या या वागण्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हटलं आहे.

तुम्ही एवढ्या नीतिमत्तेच्या गप्पा मारता, मग आदर्शमध्ये फ्लॅट कसा काय घेतला बुवा? या प्रश्नात कसला आलाय जातीयवाद? या प्रश्नात एक तरी जातीवाचक शब्द आहे काय? असेल तर उत्तमरावांनी तो सांगून महाराष्ट्राच्या 10 कोटी मराठी जनतेच्या ज्ञानात भर घालावी. उत्तमराव, तुमचे चुकलेच! असं सामनाच्या अग्रलेखात नमुद करण्यात आलंय...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2014 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...