कोल्हापुरातलं टोल आंदोलन आज दिवसभर चांगलंच चिघळलं. यामध्ये संतप्त जमावाने 4 टोलनाक्यांची पेटवून टाकले. टोलप्रश्नावर तोडगा काढण्याता प्रयत्न सुरू असून बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे, तर गुरूवारी कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आयआरबीला टोलनाके बंद ठेवण्याच्या सूचना दिली आहे. तसंच टोलप्रश्नी शिवसेनेने जाहीर केलेला उद्याचा बंदही मागे घ्यावा, असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं आहे.
मंत्र्यांच्या टोल बंदीच्या आश्वासनानंतरही आयआरबी कंपनीची टोलवसुली सुरुच असल्याने आंदोलकांनी फुलवाडी, शिरोलीसह 4 टोलनाके तोडफोड करून पेटवले. या दोन्ही टोलनाक्यांवर बुलडोझरन उद्ध्वस्त करून त्यांना जाळून टाकले.