शिंदेंचं घूमजाव, राहुल गांधींच पंतप्रधानपदाचे उमेदवार !

  • Share this:

Image img_231112_shinde4523_240x180.jpg11 जानेवारी : शरद पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल असं वक्तव्य करून गोंधळ उडवून देणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता घूमजाव केलंय. राहुल गांधी हेच आमचे नेते असून त्यांच्या नावावर पक्षाचं एकमत आहे अशी सारवासारव शिंदेंनी केली. शिंदे यांनी पवारांबद्दलवक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. त्यामुळे अधिक वाद टाळण्यासाठी शिंदेंनी घूमजाव करत राहुल गांधींच आमचे नेते आहे असं स्पष्ट केलं.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वेगळाच सूर लावला. सोलापूरमध्ये दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात शिंदेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी शिंदे म्हणाले की, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल त्यामध्ये काही दूमत नाही. मी आताच म्हणत नाही तर केंद्रीय स्तरावर सुद्धा हेच बोललोय. प्रत्येकांची इच्छा असते. पवार 1992 पासून पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते पण दुर्देवाने त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि ते राज्यात आले असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.

पण आपल्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाल्यामुळे शिंदेंनी लगेचच घूमाजवही केलं. राहुल गांधी हेच आमचे नेते असून आमच्या पक्षाचं त्यांच्या नावावर एकमत आहे अशी सारवासारव शिंदे यांनी केली. एकंदरीतच या वादाच्या निमित्ताने शिंदे यांनी सारवासारव जरी केली असली तरी राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे असे स्पष्ट संकेत दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2014 08:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading