कलेचा आविष्कार असं मुंबईचं नवं विमानतळ !

कलेचा आविष्कार असं मुंबईचं नवं विमानतळ !

  • Share this:

3464373w7y6waegwsmumbai 4523410 जानेवारी : कलेचा अदभूत अविष्कार, मनमोहक, आलिशान अशा मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनल -2 चं उद्घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पार पडलं.  नव्या आणि अतिशय देखण्या रुपात असलेलं टर्मिनल टू प्रवाशांसाठी खुलं झालंय. जीव्हीके या कंपनीने हे भव्य दिव्य असं विमानतळ सत्यात साकरलं आहे. पण उद्घाटनाला गालबोटं लागलंय. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुनील प्रभू यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी अपमान झाला असल्यानं कार्यक्रमाला जाणं टाळलं. मात्र मुंबईकरांच्या सेवेत असं अदभूत असं भव्य विमानतळ आता सेवेत दाखल झालंय.

कसं आहे हे भव्यदिव्य टर्मिनल-2 ?

मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनल - 2 हे कुठलं आर्ट एक्जिबिशन नाही तर हे आहे मुंबईतल्या जीव्हीके छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचं टर्मिनल क्रमांक 2 म्हणजे टी 2. या टर्मिनलमध्ये कलेवर भर देण्यात आलाय आणि म्हणूनच हे टर्मिनल जगाच्या नकाशावर मुंबईला एक नवी ओळख द्यायला सज्ज झालंय.

जीव्हीकेचे डिजाइन एंड प्लानिंग चिंतन शुक्ला म्हणतात, हे टर्मिनल म्हणजे टिपिकल स्टील आणि ग्लासची बिल्डिंग नको, असं एमडीचं म्हणणं होतं. या टर्मिनलमधून मुंबईची संस्कृती झळकावी, अशी त्यांची इच्छा होती. एखाद्याच्या डोळ्याला पट्टी बांधून इथे सोडलं तर हे मुंबई एअरपोर्ट आहे, हे त्याला ओळखता यायला हवं.

या टर्मिनल-2चं डिझायनिंग केलंय न्यूयॉर्कचे प्रसिद्ध आर्किटेक्ट्स स्किडमोर, ओविंग्ज आणि मेरिल म्हणजेच एसओएस (SOM)नं. दुबईची प्रसिद्ध बुर्ज खलिफा बिल्डिंग आणि शिकागोचं विलिस टॉवरही त्यांनीच बनवलंय. ठिकठिकाणी दिसणार्‍या पांढर्‍या मोरांच्या प्रतिमा टर्मिनलला वेगळाच लूक देतात.

या टर्मिनलच्या छताची उंची 40 मीटरहून जास्त ठेवण्यात आलीय. हेडहाऊसच्या छतात 272 झरोके आहेत. खालून बघितलं तर एखादा हीरे जडीत दागिणा बघितल्याचा भास होतो. हे झरोके आणि काचांचा इतक्या खुबीने वापर करण्यात आलाय की, त्यामुळे टर्मिनलमध्ये सूर्यप्रकाशही भरपूर असतो.

टर्मिनल-2च्या या बिल्डिंगमध्ये भारतीय संस्कृतीची छाप दिसते. हाताने बनवलेली 963 झुंबरं टर्मिनलची शोभा अधिकच वाढवतात. या झुंबरांसाठीची प्रेरणा कमळांपासून घेण्यात आलीय.

या टर्मिनलचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे तीन किलोमीटर लांब असलेली आर्ट वॉल.. कलाकुसरीनं नटलेली ही भींत बनवण्यासाठी दिड हजारांहून जास्त कलाकारांची मेहनत लागलीय.

या एका भिंतीला देशातली सर्वात मोठी आर्ट गॅलरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 15 जानेवारीला हे टर्मिनल-2 आणि कलेचा खजिना जनतेसमोर येईल.

First published: January 10, 2014, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading