News18 Lokmat

तासाभराच्या संपानंतर मध्य रेल्वे ट्रॅकवर, प्रवाशांचे हाल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2014 11:07 PM IST

तासाभराच्या संपानंतर मध्य रेल्वे ट्रॅकवर, प्रवाशांचे हाल

local 3410 जानेवारी : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि गार्डने अचानक संप पुकारल्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. आज शुक्रवारी संध्याकाळी विविध मागण्यांसाठी मोटरमन आणि गार्डने कामबंद संप केला त्यामुळे तब्बल 1 तास रेल्वे वाहतूक रोखून धरली.

पण यामुळे संध्याकाळी घरी परतणार्‍या चाकरमान्यांचा मात्र खोळंबा झाला. आता मध्य रेल्वे पूर्वपदावर आली असली तरी मध्य आणि हार्बर रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. मध्य आणि हार्बरच्या लोकल स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी झालीय.

संध्याकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना लोकल स्टेशनवर गेल्यावर मोटरमनच्या संपाला सामोरं जावं लागलं. अनेक स्टेशनवर लोकलच्या गाड्या तासभर न हलल्यामुळे एकच गर्दी उसळलीय. काही प्रवाशांनी 'रोज मरे त्याला कोण रडे' असं म्हणून बेस्ट बस, टॅक्सीसाठी स्टेशन बाहेर पडले पण ऐन संध्याकाळीची गर्दी आणि त्यातच मोटरमनचा संप याचा परिणामही बस,टॅक्सीच्या वाहतुकीवर झाला. त्यामुळे तासभर रांगते ताटकळत कसेबसे चाकरमान्यांनी घरची वाट धरली. मोटरमन आणि गार्डनी तासभर संप पुकारुन काय साधले असा सवाल विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2014 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...