राज ठाकरे संधीसाधू -तावडे

राज ठाकरे संधीसाधू -तावडे

  • Share this:

tawade on raj10 जानेवारी :  'गुजराती मतांसाठी मोदी चांगले, आता मात्र मोदी वाईट' अशी संधीसाधू भूमिका राज ठाकरे घेत असल्याची टीका विनोद तावडे यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये भाजपची बैठक सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर साधलेल्या शरसंधानाचे चांगलेच पडसाद आज भाजपच्या बैठकीत उमटले.

त्यादरम्यान, राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार बैठकीत घेण्यात आला. मुंबईत कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवता येईल या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली, ज्येष्ठ नेते राम नाईक, आमदार विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आदी नेते चिंतन बैठकीत हजर आहेत.

मनसेचा दुटप्पीपणा, आम आदमी पार्टीचा अतिरेकी लोकानुनय, मुख्यमंत्र्यांची डागाळलेली प्रतिमा या सगळ्याचा विनोद तावडेंनी चांगलाच समाचार घेतला. गुरुवारी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले होते. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता अशी टीका राज यांनी केली होती. राज यांची टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली. त्यामुळे भाजपने 'मनसे' टीका सुरू केलीय.

First published: January 10, 2014, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading