टोलविरोधात कोल्हापुरकरांचे उपोषण सुरूच, 4 जणांची प्रकृती खालावली

टोलविरोधात कोल्हापुरकरांचे उपोषण सुरूच, 4 जणांची प्रकृती खालावली

  • Share this:

toll 34610 जानेवारी : कोल्हापूरमध्ये टोलविरोधातल्या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळतोय. टोलविरोधातल्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. मात्र आतापर्यंत 4 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई यांना शुक्रवारी दुपारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शुक्रवारी सकाळी टेम्पो असोसिएशननं महापालिकेसमोरच्या उपोषणस्थळावर आपल्या वाहनांसह रॅली काढून टोलविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर टोलबाबत निर्णय न झाल्यास येत्या 26 जानेवारीला पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांना ध्वजारोहणावेळी काळे झेंडे दाखवले जातील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. त्याचबरोबर वकिलांच्या बार असोसिएशननं आणि मराठा महासंघानंही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

दुसरीकडे आज महिला हक्क समितीच्या महिला सदस्यांनाही टोलविरोधातल्या रोषांना सामोरं जावं लागलं. समितीच्या प्रमुख निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांना कृती समितीने घेराव घालत टोलबाबत सरकारदरबारी जाब विचारण्याची मागणी केलीय. त्यानुसार सरकारने सहानुभुतीपूर्वक टोलबाबत फेरविचार करावा अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केलीय. मात्र दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून सरकारी डॉक्टारांकडून तपासणी करुन घेणार नसल्याचं उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2014 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading