मलकापूरजवळ एसटीला अपघात, पाच विद्यार्थी ठार

मलकापूरजवळ एसटीला अपघात, पाच विद्यार्थी ठार

  • Share this:

Buldhanajpg10 जानेवारी : बुलडाणा जिल्ह्यात मलकापूरजवळ कंटेनरची एसटी बसला धडक बसल्याने पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूरजवळ हा अपघात झाला.

मलकापूरजवळ भरधाव कंटनेरने विद्यार्थ्यांच्या एसटी बसला धडक दिल्याने हा अपघात घडला. बुलढाणा जिल्हयातील मलकापूरच्या कोटी गावातून सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन ही एसटी बस जात होती. सकाळी 7 वाजता हा अपघात घडला. या घटनेत 20 विद्यार्थी जखमी असून त्यातील 12 जण गंभीर आहेत. जखमींना मलकापूरच्या गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published: January 10, 2014, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading