महायुतीत एक ना धड चिंद्या भाराभर -राणे

महायुतीत एक ना धड चिंद्या भाराभर -राणे

  • Share this:

09 जानेवारी : आता महायुतीत एक ना धड चिंद्या भाराभर अशी परिस्थिती आहे अशी जळजळीत टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महायुतीवर केली तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता एकत्र आले आहेत. तर महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष केवळ लोभाकरता सहभागी झाला आहे अशी टीकाही राणे यांनी केली. ठाण्यातील शिवाई नगर येथे सुरू असलेल्या मालवणी महोत्सवानिमित्त राणे ठाण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीशी हातमिळवणी केली. स्वाभिमानीने महायुतीत दाखल झाल्यामुळे ताकद वाढलीय. त्यामुळे राष्ट्रवादीने धसका घेतलाय. मात्र स्वाभिमानीमुळे आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. राजू शेट्टी यांची ताकद मर्यादित आहे अशी टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आज या विशालयुतीवर काँग्रेसने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

First published: January 9, 2014, 8:59 PM IST

ताज्या बातम्या