नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपद सोडावं -राज ठाकरे

  • Share this:

raj thakarey44409 जानेवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होताच नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधान देशाचा असावा, तो राज्याचा असू नये असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलंय. मनसेच्या राज्यस्तरीय बैठकीसाठीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामाचा मी आदर करतो, पण देशाला बदलाची गरज आहे, त्यांनी आता फक्त आपल्या राज्यापुरता विचार करणं योग्य नाही.मुंबईत सभा घेऊन तुम्ही गुजराती बांधवांबद्दल बोलत असाल, सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल बोलत असाल तर मग शिवाजी महाराजांबद्दल का नाही? अशी परखड टीकाही राज यांनी मोदींवर केली.

त्याबराबर आम आदमी पार्टीवरही राज ठाकरे यांनी टीका केली. काँग्रेसला दिल्लीत काम न केल्याता फटका बसला. दिल्लीत घडलेल्या बदलांचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात 'आप'ची गरज नाही महाराष्ट्रात आम्हीच 'बाप' आहोत असंही ते म्हणाले. आजही महाराष्ट्र नंबर 1 आहे, मात्र प्रगतीचा आलेख उंचवायला हवा. वेळ निघून गेल्यावर निर्णय घेणे व्यर्थ आहे. यापुढे राज्यातील विविध भागात बैठकी घेणार आहे. नाशिकमधल्या विकासकामांबद्दल मला पाच वर्षांनी विचारावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading