S M L

अंगणवाडी सेविका आक्रमक, अर्धातास रास्ता रोको

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2014 10:58 PM IST

अंगणवाडी सेविका आक्रमक, अर्धातास रास्ता रोको

anganwadi 4433408 जानेवारी : राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांनी 6 तारखेपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं होतं. या जेलभरो आंदोलनाला हजारोंच्या संख्येनं राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सातत्यानं आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांचा बांध तुटला आणि त्यांनी आझाद मैदानासमोरचा रस्ता तब्बल 20 मिनिटे अडवून ठेवला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक महिला आझाद मैदानात परतल्या. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. उद्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

मानधनवाढीच्या प्रस्तावाबाबत निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं तसंच टीएचआर ऐवजी अन्य पोषण आहार सुरू करणे, उन्हाळी आणि आजारीपणाची रजा इत्यादी मुद्द्यांबाबत कामगार नेत्याबरोबर निर्णय घेण्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मात्र सेवा समाप्तीनंतर एकरकमी लाभाबद्दलचा कॅबिनेटचा निर्णय होईपर्यंत संप चालूच राहणार असल्याच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांनी सांगितलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2014 10:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close