राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्री लागले कामाला !

राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्री लागले कामाला !

  • Share this:

Image img_217532_ajitvscm_240x180.jpg08 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कामाला लागले आहेत. आता राज्य सरकारने तातडीनं निर्णय घेऊन ते लोकांपर्यंत पोचवण्याचा चंग बांधलाय.

त्यामुळे आता आठवड्यातून दोनवेळा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा एकदा चार तास लांबली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार गतिमान नसल्यानं आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे 622 कोटी रुपये खर्चाच्या 147 सिंचन प्रकल्पांना आज तातडीनं मान्यताही देण्यात आली. तसंच येत्या 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यान लेखानुदान अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात 30 जूनपर्यंतच्या खर्चाला राज्य सरकार मान्यता घेणार आहे.

 काय घडलं पडद्यामागे

  • - सकाळी 10.30 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट सुरू
  • - सकाळी 10.35 वाजता प्री कॅबिनेटची बैठक सुरू होण्यापूर्वी सर्व अधिकार्‍यांना बाहेर जाण्यास सांगितले
  • - यामुळे कॅबिनेटची मुख्य बैठक लांबणीवर पडली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला
  • - दुपारी 1 वाजता - दोन तासांचा खल झाल्यानंतर कॅबिनेटला पुन्हा सुरुवात झाली.
  • - कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांकडच्या सर्व प्रस्तावांचा विचार करुन तातडीनं निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • - संध्या. 6 वाजता - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची छाननी समितीची बैठक झाली. त्यात मंत्र्यांकडून मागवलेल्या प्रस्तावांची छाननी झाली

First published: January 8, 2014, 10:01 PM IST

ताज्या बातम्या