'चला, हवा येऊ द्या' 'टाइमपास'ची 10 कोटींची कमाई

'चला, हवा येऊ द्या' 'टाइमपास'ची 10 कोटींची कमाई

  • Share this:

345 timepass movie06 जानेवारी :'आई बाबा आणि साई बाबाची शपथ', 'अरे ! हम गरीब हुये तो क्या हुआ, दिल से अमीर है..' आणि 'आम्ही गरीब असलो तरी काय जहायले..' असे एका पेक्षा एक डायलॉगने भरपूर टाइमपास चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमशान घातले आहे. सहा दिवसातच टाइमपासने 10 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

'नव्या वर्षाची रॉमेंटीक सुरूवात' असं म्हणत 3 जानेवारी रोजी टाइमपास रिलीज झाला. दगडू आणि प्राजक्ता या जोडीची लव्हस्टोरी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली असून चित्रपटगृहांत हाऊसफुल्लचे बोर्ड्स झळकत आहे. टाइमपास रिलीज होऊन तीनच दिवस झाले तेव्हा टाइमपासने साडेपाच कोटींची कमाई केली होती आणि आज सहाच दिवसात 10 कोटींचा आकडा गाठला आहे.

केतकीने साकारलेली 'प्राजक्ता'ची भूमिका आणि प्रथमेशने साकारलेली 'दगडू'ची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. खास करून टप्पोरी आणि बिनधास्त दगडूने चांगलीच धम्माल उडवलीय. ठाणे-डोंबिवली-कल्याण-पनवेल अगदी रायगडपर्यंत जे वातावरण 90च्या काळात होतं, त्याच वातावरणात फुलणारी ही लव्हस्टोरी आहे. प्राजक्ता राहतेय ती चाळ म्हणजे सुशिक्षित म्हणवणार्‍या उच्चवर्णीयांची आणि दगडू गरीब, रिक्षावाल्याचा मुलगा असतो. अनेक वर्ष दगडू दहावीतच अडकलाय त्यामुळे तो पेपरवाटण्याचं काम करत असतो. कॉलेजमध्ये प्राजक्ताला पाहिल्यानंतर दगडू तिच्या प्रेमात पडतो. आणि मग याची लव्हस्टोरी सुरू होती. दुनियेची कसलीच फिकीर नसलेल्या या प्रेमी जीवांचं हे प्रेम कयामत पासून कयामत पर्यंत कसं जातं, त्याचा टाइमपास प्रवास सिनेमात दिसतो. मागिल वर्षी 'दुनियादारी' सिनेमाने बॉक्सऑफिसवर भरघोस कमाई केली होती. आता त्याच्यापाठोपाठ 'टाइमपास'ने नव्या वर्षात दमदार एंट्री करत कमाईचे रेकॉर्ड रचत आहे.

First published: January 8, 2014, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading