अभिनेत्री अलका पुणेवार चेन्नईमध्ये सुखरुप

अभिनेत्री अलका पुणेवार चेन्नईमध्ये सुखरुप

  • Share this:

punewar 407 जानेवारी : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मराठी अभिनेत्री अलका पुणेवार चेन्नईमध्ये सापडल्या आहे. पुणेवार सुखरुप असून चेन्नई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना आणण्यासाठी ठाणे पोलिसांच्या दोन टीम रवाना झाल्या आहेत.

27 डिसेंबरपासून अलका पुणेवार बेपत्ता होत्या. ठाण्यातल्या घरुन त्या पुण्याला जायला निघाल्या पण पुण्याला पोचल्याच नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोलीजवळ त्यांची कार दरीमध्ये चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यामुळे त्या कुठे गेल्यात, याबद्दल तर्कविर्तक लढवले जात होते. पण त्यांचा पत्ता लागलेला नव्हता.

त्यांचे पती संजय पुणेवार यांनी याविषयी कोपरी पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. आज अलका पुणेवार चेन्नईमध्ये सापडल्यात. त्या सुखरुप असून त्या चेन्नई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी दोन टीम तयार केल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी या टीम रवाना झाल्या आहेत. मात्र पुणेवार चेन्नईला कशा पोहचल्यात, त्यांच्या बेपत्ता होण्याचं कारण काय हे मात्र अजून कळू शकलं नाही.

First published: January 7, 2014, 7:47 PM IST

ताज्या बातम्या