भाजपच्या 'महागर्जना'नंतर शिवसेनेची 'महानिर्धार' रॅली

भाजपच्या 'महागर्जना'नंतर शिवसेनेची 'महानिर्धार' रॅली

  • Share this:

shivsenaraly07 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून येत्या 23 जानेवारीला शिवसेनेतर्फे 'महानिर्धार' सभेचे आयोजन करण्यात आलंय. या महारॅलीच्या निमित्ताने राज्यभरातील शिवसैनिक या सभेला उपस्थित राहूण शक्तिप्रदर्शन दाखवणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीची सत्ता आणण्यासंदर्भात या सभेत शिवसैनिकांकडून निर्धार करण्यात येणार आहे. नुकतीच नरेंद्र मोदींच्या मुंबईतील 'महागर्जना' सभेच्या निमित्ताने भाजपने राज्यभरातील कार्यकर्त्यांना मुंबईत गोळा केले होते. त्या पार्श्वभूूमीवर शिवसेनाही आता 'महानिर्धार' रॅलीसाठी सरसावली आहे.

सभेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी गोरेगाव मधील एनएसआय मैदान किंवा बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. नुकतीच या सभेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनाभवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे शिवसेना या सभेमार्फत आपलं शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

First published: January 7, 2014, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading