लोकसभेसाठी राष्ट्रवादी तयार, लवकरच नावं जाहीर

लोकसभेसाठी राष्ट्रवादी तयार, लवकरच नावं जाहीर

 • Share this:

Image pawar_on_raj_300x255.jpg06 जानेवारी : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत आढावा बैठकीत घेतली. बैठकीतल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं संभाव्य उमेदवारांची यादी तयारी केलीय. पण यात केवळ दोनच मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलीय.

निवडणुकीतली कुठलीही जोखीम पत्करायला राष्ट्रवादीचे मंत्री तयार नसल्याचं चिन्हं दिसत आहेत. नाशिकमधून छगन भुजबळ, बीडमधून सुरेश धस यांची तयारी आहे. आणि काँग्रेसनं जागा सोडण्याची तयारी दाखवली तर रायगडमधून सुनील तटकरे आणि यवतमाळ-वाशिममधून मनोहर नाईक यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

परंतु, मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली नाही, म्हणून काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दम भरला होता. तरीदेखील केवळ दोन मंत्र्यांनीच लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलीय. याचीच आज दिवसभर चर्चा होती.

शरद पवारांची टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट करत नव्या दमाच्या टीमकडे सूत्रं सोपवण्याचं सूतोवाच केलंय. राष्ट्रवादीची नवी टीम राजकीय वारसदारांचीच असेल हे निश्चित आहे.

राजकारणातील दिग्गज एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलं. त्याच धर्तीवर सामान्य चेहर्‍याचा एखादा अपवाद वगळता, शिक्षण सम्राट, साखर सम्राट आणि सहकार सम्राट या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली. तोच आधार आजही राष्ट्रवादीच्या वाढीसाठी महत्वाचा मानला जातोय.

राष्ट्रवादीच्या नव्या टीमवर नजर टाकली तर सर्वच सदस्य मंत्र्यांची मुलं आहेत. यात लोकसभेसाठी बारामतीतून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे असणार आहे. तर राज्याच्या टीममध्ये पुतणे अजित पवार असणार आहे. तर मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय दिना पाटील लोकसभेच्या टीममध्ये असणार आहे.

त्यापाठोपाठ शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आनंद परांजपे, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक आणि बीडच्या राजकारणात मुंडे काकांचा हात सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले धनंजय मुंडे पवारांच्या लोकसभेच्या टीममध्ये असणार आहे. तसंच राज्याच्या टीमची यादीही मोठी आहे.

अशी आहे लोकसभेची टीम

 1. सुप्रिया सुळे, बारामती
 2. संजय दिना पाटील, मुंबई
 3. आनंद परांजपे, कल्याण
 4. संजीव नाईक, नवी मुंबई
 5. समीर भुजबळ, नाशिक
 6. धनंजय मुंडे / अमरसिंह पंडित, बीड
 7. धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक, कोल्हापूर
 8. लक्ष्मण जगताप, मावळ

अशी आहे राज्यातली टीम

 • - अजित पवार
 • - भास्कर जाधव, रत्नागिरी
 • - जितेंद्र आव्हाड, ठाणे
 • - राजेश टोपे, जालना
 • - सुनील तटकरे, रायगड
 • - उदय सामंत, रायगड
 • - संजय सावकारे, जळगाव
 • - डॉ. हिना गावित, नंदुरबार
 • - अनिकेत तटकरे, रायगड
 • - राणा जगजीतसिंह, उस्मानाबाद
 • - रणजीतसिंह मोहिते पाटील सोलापूर
 • - पंकज भुजबळ, नाशिक
 • - विक्रम पाचपुते, अहमदनगर
 • - वैभव पिचड, अहमदनगर
 • - अक्षय मुंदडा, बीड
 • - नंदादेवी बाभूळकर, कोल्हापूर
 • - निरंजन डावखरे, ठाणे
 • - सलील देशमुख, नागपूर

लोकसभेचे संभाव्य उमेदवार

 • - अमरावती - राजेंद्र गवई, गुणवंत देवपारे, दिनेश बूब
 • - बीड - जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस
 • - मावळ - लक्ष्मण जगताप
 • - शिरूर - वल्लभ बेनके
 • - कल्याण - आनंद परांजपे
 • - ठाणे - संजीव नाईक
 • - उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील
 • - माढा - विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय मामा शिंदे, सुनेत्रा पवार
 • - परभणी - विजय भांबळे
 • - गोंदिया - प्रफुल्ल पटेल
 • - बुलडाणा - रेखाताई खेडेकर, राजेंद्र शिंगणे
 • - अहमदनगर (द.) - राजीव राजळे, बबनराव पाचपुते
 • - कोल्हापूर - मुन्ना महाडिक
 • - दिंडोरी - ए.टी. पवार
 • - सातारा - उदयनराजे भोसले
 • - बारामती - सुप्रिया सुळे
 • - मुंबई (ईशान्य) - संजय दिना पाटील
 • - जळगाव - काँग्रेसला सोडण्याची तयारी
 • - रावेर - रवींद्र पाटील
 • - हिंगोली - काँग्रेसला सोडण्याची तयारी
 • - नाशिक - छगन भुजबळ
 • - हातकणंगले - जयंत पाटील

First published: January 6, 2014, 10:55 PM IST

ताज्या बातम्या