'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप मागे

'मार्ड'च्या डॉक्टरांचा संप मागे

  • Share this:

mard doctor403 जानेवारी : सोलापूरमध्ये निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेलं 'मार्ड'च्या डॉक्टारांनी संप मागे घेतला आहे. मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. आज रात्री 8 वाजेपासून राज्यातील संपावर गेलेले डॉक्टर कामावर रुजू होणार आहे.

सोलापुरात पोलिसांनी एका निवासी डॉक्टरला बेदम मारहाण केली होती याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मार्डच्या या संपाबाबत राज्य सरकारला फटकारलंय. डॉक्टरला मारहाण करणार्‍या पोलिसांनी तात्काळ अटक करा आणि दुपारपर्यंत कारवाईचा रिपोर्ट द्या, असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. तसंच मुंबई हायकोर्टाने याबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. कोर्टाने डॉक्टरांना मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाईचेही आदेश दिले.

ही कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोर्टाने मार्डला संप मागे घेण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. मार्डच्या डॉक्टरांनीही झालेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहमंत्री आर आर पाटील यांनीही मारहाण करणार्‍या पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले आहे. सोलापुरात निवासी डॉक्टरला पोलिसांनी मारहाण केली होती. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर संपावर गेले होते. अखेर कोर्टाने आदेश दिल्यानंतर संप मागे घेण्यात आलाय.

First published: January 3, 2014, 5:06 PM IST

ताज्या बातम्या