'आदर्श' नेते सुटले, अधिकारी अडकले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2014 09:39 PM IST

Image img_232942_adarshscam_240x180.jpg02 जानेवारी : बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणाचा अंतिम अहवाल राज्य सरकारनं अंशतः स्वीकारलाय. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पाय आणखी खोलात गेलाय.

अशोक चव्हाणांवरचा ठपका स्वीकारण्यात आला आहे. तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यावरचे ताशेरे फेटाळले आहे. अधिकार्‍यांवरचे ठपके आणि ताशेरे स्वीकारले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे, सुनील तटकरे यांच्यावरचे ताशेरे फेटाळण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या अहवालातला 25 अपात्र व्यक्तींचं सभासदत्व रद्द करण्याची कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय. तसंच अपात्र व्यक्तींना सभासदत्व दिल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शवरून कॅबिनेटमध्ये जोरदार खडाजंगी झालीये. राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांवरचे ताशेरे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्यात आला होता. राजेश टोपे आणि सुनील तटकरेंना वगळा, त्यांच्यावरचे ताशेरे मागे घ्या, नाहीतर वाईट परिणाम होतील अशी धमकीच राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना दिली अशी माहिती सूत्रांनी दिली.

या नेत्यांवरचे ठपके कायम

अशोक चव्हाण,

Loading...

माजी मुख्यमंत्री

बाबासाहेब कुपेकर,

माजी विधानसभा अध्यक्ष

हे नेते सुटले

सुशीलकुमार शिंदे,

केंद्रीय गृहमंत्री

विलासराव देशमुख,

माजी केंद्रीय मंत्री

शिवाजीराव निलंगेकर,

माजी मुख्यमंत्री

राजेश टोपे,

तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री

सुनील तटकरे,

जलसंपदा मंत्री

 हे अधिकारी अडकले

सुभाष लाला

माजी प्रधान सचिव, CMO

प्रदीप व्यास

तत्कालीन जिल्हाधिकारी, मुंबई

जयराज फाटक

तत्कालीन पालिका आयुक्त

रामानंद तिवारी

तत्कालीन प्रधान सचिव, नगरविकास

सी.एस. संगीतराव

तत्कालीन प्रधान सचिव, CMO

डी.के. शंकरन

माजी मुख्य सचिव

टी.सी. बेंजामीन

माजी अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास

आय.ए. कुंदन

तत्कालीन जिल्हाधिकारी, मुंबई

पी.व्ही. देशमुख

तत्कालीन उपसचिव, नगरविकास

सुरेश जोशी

माजी आयुक्त, MMRDA

टी. चंद्रशेखर

माजी आयुक्त, MMRDA

उमेश लुकतुके

माजी चीफ टाउन प्लॅनर

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...