S M L

'मार्ड'चे निवासी डॉक्टर्स संपावर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2014 02:20 PM IST

Image img_236972_marddoctorstrickeback4_240x180.jpg02 जानेवारी : राज्यातील जवळपास 4000 निवासी डॉक्टर्सनी बेमुदत संप पुकारला आहे. सोलापूरमधल्या एका निवासी डॉक्टरला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर्सनी हे पाऊल उचललं आहे. या दरम्यान सर्व वैद्यकीय महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय 'मार्ड'ने घेतला आहे.

सोलापूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये पोलीस एका निवासी डॉक्टरला मारहाण करत असल्याचे आणि त्याचा गळा पकडत असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॉ. प्रशांत पाटील या डॉक्टरने सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर प्रसूती वेदना होत असतानाही महिलेवर उपचार करण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली.


याचा निषेध करत 'मार्ड'ने आज संप पुकारला आहे. संबंधित पोलिसांना अटक करावी अशी 'मार्ड'ची मागणी आहे. मात्र, यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होणार आहेत. पण या घटनेमुळे निवासी डॉक्टर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 02:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close