औरंगाबादेत युतीच्या नेत्यांमध्ये 'राडा'

औरंगाबादेत युतीच्या नेत्यांमध्ये 'राडा'

  • Share this:

sena bjp 1 जानेवारी : औरंगाबादेत 'न्यू इयर पार्टी'त शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच राडा झालाय. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर भाजपने बहिष्कार टाकला होता. या कारणावरूनच रात्री भाजपचे गटनेते संजय केणेकर आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकात खैरे यांच्यात बाचाबाची झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 'न्यू इयर पार्टी'चं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत खैरे आणि केनेकर आमने-सामने आले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाल्याचं कळतंय. चंद्रकांत खैरे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केणेकर यांनी केला आहे.

पण चंद्रकांत खैरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा निश्चय सेना-भाजपच्या युतीने केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातला दुरावा वाढताना दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या महापौरांवर कोणी टीका करत असेल, तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा खैरे यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2014 02:20 PM IST

ताज्या बातम्या