S M L

हॉस्पिटलमधील अस्वच्छतेमुळे डॉक्टरचा बळी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2014 10:26 AM IST

Image img_219742_dengue26236_240x180.jpg1 जानेवारी : टीबीमुळे एका इंटर्न डॉक्टरच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये डॉ.सुमेध पगारे या 26 वर्षीय डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या हेल्थ सेंटरमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असल्यामुळे डॉ. सुमेध यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचा आरोप त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे.

ही घटना घडल्यानंतर महापालिकेला आता जाग आली आणि आजपासून हेल्थ सेंटरमध्ये पेस्ट कंट्रोलला सुरुवात झाली आहे. डॉ. सुमेध मुळचे चंद्रपूरचे होते. गिरगावच्या झावबावाडी हॉस्टेलमध्ये ते राहत होते. ताप आल्याने त्यांना शनिवारी नायरच्या एमआयसीयूत दाखल करण्यात आले होते.

पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या म्हणण्यानुसार, हा डेंग्यूचा रुग्ण होता. मुंबईत वर्षभरामध्ये डेंग्यूचे एकूण 11 बळी गेले असून सुमेध हा डेंग्यूचा 12वा बळी ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2014 09:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close