न्युझीलंड दौर्‍यातून युवराजला डच्चू

न्युझीलंड दौर्‍यातून युवराजला डच्चू

  • Share this:

team india yuvraj singh out31 डिसेंबर : न्यूझीलंड वन-डे दौर्‍यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगला या दौर्‍यातून डच्चू देण्यात आलाय. त्याच्या जागी मुंबईचा अजिंक्य रहाणेला टीममध्ये समावेश करण्यात आलाय. तर टीममध्ये परतण्यासाठी उत्सुक असलेल्या गौतम गंभीरच्या पदरी निराशा आलीय. गंभीरला संधी देण्यात आली नाही. तर नवीन चेहर्‍यांना यावेळी संधी देण्यात आली आहे.

फास्टर बॉलर ईश्वर पांडे आणि वरुण ऍरॉनला नव वर्षाची भेट देत टीममध्ये समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नीचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. ईश्वर पांडे आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलीय.

कॅन्सरवर मात करून टीममध्ये परतलेला युवराज सिंगने सुरूवात चांगली केली असली तरी गेल्या काही सामन्यामध्ये त्याचा सूर हरपला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर युवराजने फक्त अर्धशतक झळकावले. तर दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर युवराजच्या पदरी पुन्हा निराशाच आली. त्यामुळे खराब फॉर्मचा ठपका ठेवत युवराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. न्युझीलंड दौरा हा पाच वनडे आणि दोन कसोटी मालिकांचा आहे. 19 ते 31 जानेवारी दरम्यान पाच वनडे खेळवले जाणार आहे. तर 6 ते 10 फेब्रुवारीला पहिली कसोटी आणि 14 ते 18 फेब्रुवारीला दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे.

अशी आहे भारतीय टीम

टेस्ट टीम - महेंद्र सिंग धोणी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा, झहीर खान, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, अंबाती रायडू, भुवनेश्वर कुमार, आर.अश्विन, उमेश यादव, रिद्धिमान साहा, ईश्वर पांडे

वनडे टीम - महेंद्र सिंग धोणी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडु, सुरेश रैना, आर.अश्विन, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अहमद शमी, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, ईश्वर पांडे, स्टुअर्ट बिन्नी, वरुण एरोन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2013 04:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading