S M L

देवकरांची तुरुंगात रवानगी

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2013 09:51 PM IST

Image img_239622_gulabraodevkar_240x180.jpg31 डिसेंबर : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर मंगळवारी जळगाव पोलिसांना शरण आले आहेत.

घरकुल प्रकरणातला त्यांचा जामीन अर्ज 17 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत पोलिसांना शरण येण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुलाबराव देवकरांना दिली होती ती आज संपलीय.

या नंतर देवकर यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने देवकरांना 3 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देवकरांना धुळे तुरूंगात हलवण्यात आलं आहे.

 

जळगाव घरकुल घोटाळा

Loading...
Loading...

- झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घरं बांधण्याचा जळगाव नगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

- प्रकल्प मंजूर करण्यामध्ये गुलाबराव देवकरांची महत्त्वाची भूमिका

- योजना मंजूर झाली तेव्हा देवकर नगराध्यक्ष आणि उच्चाधिकार समितीचे सदस्य

– खान्देश बिल्डरला नियम डावलून प्रकल्पाचा ठेका दिल्याचा ठपका

- एका रात्रीतून निविदा प्रक्रियेचे नियम बदलण्यात आले

- ठेकेदाराला प्रारंभिक रक्कम देवकर यांच्या सहीनं दिली गेली

- प्रकल्पाची मूळ किंमत 89 कोटी होती

- हुडकोकडून 103 कोटींचं कर्ज घेतलं गेलं

- 29 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2013 03:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close