'थर्टी फस्ट'ला पोलिसांची विदेशी पर्यटकांवर 'नजर'

'थर्टी फस्ट'ला पोलिसांची विदेशी पर्यटकांवर 'नजर'

  • Share this:

Image img_229662_maharashtrapolice_240x180.jpg31 डिसेंबर : सर्वत्र नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईत नव वर्षाच्या स्वागतासाठी येणार विदेशी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मुंबईत पोलिसांनी याबाबत अलर्ट जारी केले आहे.

विदेशी पर्यटकांच्या रुपात काही दहशतवादी मुंबईत येऊ शकतात. शहरातील प्रमुख ठिकाणची रेकी या दहशतवाद्यांकडून होऊ शकते अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय. दक्षतेसाठी मुंबईत विदेशी पर्यटक कुठे येणार, कुठल्या ठिकाणांना भेट देणार, कुठल्या ठिकाणांचे फोटो घेतात यावर पोलीस लक्ष ठेवणार आहेत.

लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हीड हेडली प्रमाणे दहशतवादी संघटना पर्यटकांच्या रुपात दहशतवादी पाठवू शकतात अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी केलाय.

First published: December 31, 2013, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading