न्यू इयर पार्टी रात्री दीड वाजेपर्यंतच!

 न्यू इयर पार्टी रात्री दीड वाजेपर्यंतच!

  • Share this:

party30 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंतच्या पाटर्‌यावर मुंबई पोलिसांनी टाच आणली आहे. मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीसाठी गृहखात्याने आधी पहाटे पाचपर्यंत मंजुरी दिली होती. पण आता ती डेडलाईन मध्यरात्री दीडपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक नाराज झाले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सेलिब्रेशन पाटर्‌यांवर निर्बंध घातले असल्याचं पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. पण न्यू इयर पार्टीचं आयोजन हॉटेल व्यावसायिकांनी आधीच केलंय. हॉटेलचं बुकिंग तसंच पार्टीची तिकीट विक्री झालीय. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना जवळपास 500 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसंच राज्य सरकारचा महसुलही बुडणार असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलं आहे. एकीकडे सेलिब्रेशन पार्टीसाठी रात्री दीड वाजेपर्यंतची डेडलाईन दिली असतानाच दुसरीकडे मात्र दारू विक्रीसाठी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांच्या या दुहेरी भूमिकेवर हॉटेल व्यावसायिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान पोलिसांच्या या आदेशाविरोधात हॉटेल व्यावसायिक कोर्टात जाणार आहेत तर युवासेनेनंही पोलिसांच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

First published: December 30, 2013, 12:38 PM IST

ताज्या बातम्या