News18 Lokmat

बलात्कारी अन्सारीला जन्मठेप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2013 05:22 PM IST

Image img_237362_nagpurrapecase_240x180.jpgगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वांद्रे येथे स्पॅनिश महिलेवरील बलात्कार प्रकरणी आरोपी मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आज दुपारी हा निर्णय दिला.

अन्सारीने चोरीच्या उद्देशाने पेरी क्रॉस रोडवरील बिल्डींगमध्ये राहणार्‍या 27 वर्षांच्या तरुणीच्या घरी घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला आणि घरातल्या मौल्यवान वस्तुंची चोरी करून तिथूृन पळ काढला.

या प्रकरणी अन्सारीवर बलात्कार, चोरी त्याच बरोबर पुरावे नष्ट करणे, चोरीच्या उद्देशाने घरात घुसणे, धमकावणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2013 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...