भारत-द. आफ्रिका कसोटी सामना अनिर्णित

  • Share this:

Image img_113022_matchwin_240x180.jpg22 डिसेंबर : भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने अखेर विजयाची संधी गमावली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्याच्या शेवटच्या दि्वशी भारताला दक्षिण अफ्रिकेला गुंडाळून विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, डु प्लेसिस (१३४) आणि एबी डिविलियर्स (१३०) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर अफ्रिकेने भारताच्या विजयाच्या आशा धुसर करून टाकल्या.

एकवेळ दक्षिण अफ्रिकाच सामना जिंकणार अशी परिस्थीती निर्माण झाली होती. दक्षिण अफ्रिकेचे ४०२ धावांवर ४ फलंदाज बाद असताना १३ षटकांमध्ये विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा सामन्यावर पकड मिळवत यजमान संघाला विजयापासून वंचित ठेवत सामना अनिर्णयीत राखण्यात यश मिळवले.

Tags:
First Published: Dec 22, 2013 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading