नगर पालिकेत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती

नगर पालिकेत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती

  • Share this:

nagar municipal corporation17 डिसेंबर : अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात आहेत. सत्ता स्थापनेसाठी 35 चा जादूई आकडा गाठणं आवश्यक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून एकूण 29 नगरसेवक आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना सहा अपक्षांची गरज आहे.

निवडून आलेले एकूण अपक्ष नऊ आहेत. मात्र, त्यांच्यापैकी 5 अपक्ष हे कर्डिले गटाचे, म्हणजे युती पुरस्कृत आहेत. त्यामुळे उरलेल्या 4 अपक्षांमधून दोघांना आपल्या गळाला लावण्याची खेळी राष्ट्रवादीतर्फे सुरू झाली आहे. महापालिकेची तिजोरी समजल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या बदल्यात दोन अपक्षांना आपल्याकडे खेचून सत्ता स्थापन करण्याच्या राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

अहमदनगर महापालिकेत 68 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस 11 जागा तर राष्ट्रवादी 18 जागा जिंकल्यात.तर भाजप 9 तर शिवसेनेनं 17 जागा जिंकल्या आहेत. तसंच मनसेने 4 जागा जिंकल्यात. तर अपक्षांच्या वाट्याला एकूण 9 जागा आल्या आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करायची असेल तर नऊ अपक्षांच्या मदत घ्यावी लागणार आहे.

अहमदनगर महापालिकेत पक्षीय बलाबल

  • राष्ट्रवादी - 18
  • काँग्रेस - 11
  • शिवसेना - 17
  • भाजप - 9
  • मनसे - 4
  • अपक्ष - 9 अपक्षांपैकी
  • एकूण 68 जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2013 04:47 PM IST

ताज्या बातम्या