News18 Lokmat

मारहाण प्रकरणी अरमान कोहलीला जामीन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2013 01:59 PM IST

मारहाण प्रकरणी अरमान कोहलीला जामीन

380_Armaan-Kohli-and-Sofia-Hayat-fighting17 डिसेंबर : 'बिग बॉस'च्या रिऍलिटी शोमधील सुपर मॉडेल सुफिया हयातला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहलीला जामीन मिळालाय. लोणावळा पोलिसांनी दोन प्रतिष्ठीत व्यक्तींच्या जामिनावर त्याची सुटका केली आहे. हयात हिने आपला प्रतिस्पर्धी अभिनेता अरमान कोहलीवर मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.

'बिग बॉस'च्या घरात प्रत्येक पर्वात काही ना काहीतरी वादविवाद होत असतात. यंदा 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात ब्रिटनचे नागरिकत्व असलेली  सुफिया हयात हिने आपला प्रतिस्पर्धी अभिनेता अरमान कोहलीवर मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. हयात हिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांकडे आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी रात्री उशिरा 'बिग बॉस'च्या घरातून अरमान कोहलीला अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2013 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...