धुळ्यात राष्ट्रवादीची बाजी, नगरमध्ये त्रिशंकू स्थिती

  • Share this:

Image img_185662_ncppune_240x180.jpg16 डिसेंबर : धुळे महापालिका निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारलीय. सत्तर जागांपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 34 जागा जिंकल्या आहे. तर शिवसेना 11, भाजप 3, काँग्रेस 7, लोकसंग्राम 1, अपक्ष 10, समाजवादी पक्ष 3 तर बहुजन समाज पक्षाला 1 जागा मिळालीय.

तीन प्रभागांमध्ये झालेल्या फेरमतमोजणीत राष्ट्रवादीला चार जागी फायदा झालाय. राष्ट्रवादीने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्यात. यात राष्ट्रवादीनं जोरदार यश संपादन करत 22 जागांवरून तीस जागा जिंकल्या आहे. तर सर्वच्या सर्व सर्व महिला उमेदवार देणार्‍या लोकसंग्रामचा धुव्वा उडवलाय. विशेष म्हणजे आमदार अनिल गोटे यांची पत्नी महापौर हेमा गोटे पराभूत झाल्यात.

दरम्यान, धुळ्यात निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दगडफेक, वाहनांची मोडतोड करण्यात आली.

अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू

अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानं सत्तेच्या चाब्या अपक्षांच्या हाती गेल्यात. नगरमध्ये काँग्रेस 11 जागांवर तर राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 4 जागांवर तर शिवसेना 10 जागांवर पुढे आहे. मनसेला 2 जागांवर आघाडी मिळालीय. भाजपच्या उपमहापौर गीतांजली काळे पराभूत झाल्यात. त्यामुळे सत्ता स्थापन करायची असेल तर नऊ अपक्षांच्या मदत घ्यावी लागणार आहे.

अहमदनगर महापालिकेत पक्षीय बलाबल

  • राष्ट्रवादी - 18
  • काँग्रेस - 11
  • शिवसेना - 17
  • भाजप - 9
  • मनसे - 4
  • अपक्ष - 9 अपक्षांपैकी
  • एकूण 68 जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2013 03:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading