मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला महिलेचा बळी

मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला महिलेचा बळी

  • Share this:

vasai 4414 डिसेंबर : एकीकडे अंधश्रद्धा, अघोरी कृत्यांना मुठ माती देण्यासाठी जादूटोणाविधेयक मंजूर करण्यात आलं तर दुसरीकडे अंधश्रद्धेनं बुरसटलेल्या लोकांचे काळे कृत्यं अजूनही सुरुच आहे. वसईमध्ये एका मांत्रिकाच्या सल्ल्यावरुन एका 50 वर्षीय महिलेचा बळी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मांत्रिकासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नालासोपार्‍यातील वालिव गावात राहणार्‍या रामधनी यादव आणि गुलाब यादव या दोन भावांनी आपल्या बायकोच्या जाचाला कंटाळून मांत्रिकांची वाट धरली. रामधनी यादव आणि गुलाब यादव यांनी हे कृत्य घडवून आणलंय. रामधनी यादवची बायको आजारी होती. तर गुलाब यादवचं बायकोबरोबर कायम भांडण होतं होतं.

या दोन्ही जाचातून सुटका करायची असेल तर नरबळी द्यावा लागेल असं सर्वजीत कहार या मांत्रिकानं सांगितलं. त्यानुसार या दोघांनी याच तांत्रिकाकडे येणारी कलावती रामसरी गुप्ता (वय 50 ) हीचा बळी देण्याचं या दोन्ही भावांनी नक्की केलं. ही महिला आपला अपंग मुलगा बरा व्हावा यासाठी तांत्रिकाकडे जात होती. दोघांनी या महिलेची हत्या केली.

ही घटना इतकी क्रुर होती की, या महिलेचं शिरचं धडापासून वेगळं करण्यात आलं. 17 नोव्हेंबर रोजी पोलिसांना धडा वेगळं शिर आढळून आलं होतं पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. दरम्यानच्या काळात एक तरुण पोलीस स्टेशनमध्ये आपली महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आला असता त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी त्या तरुणांला महिलेचा मृतदेह दाखवला असता. मृत महिला आपली आई असल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्या महिलेचे फोन कॉल तपासले असता शेवटचा फोन कुठून करण्यात आला होता ते ठिकाणा शोधून काढले. त्यानुसार पोलिसांनी वालिव गावात चौकशी केली असता घटलेला प्रकार हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिकासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First published: December 14, 2013, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading