11 डिसेंबर : जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आज बुधवारी दुपारी माजी आयपीएस अधिकारी आणि अण्णांच्या सहकारी किरण बेदीही शनिवारपासून अण्णांसोबत उपोषण करणार आहेत.
लोकपाल विधेयक सरकारच्या अजेंड्यावरच नाहीय मग संसदेत बिल मंजूर कसं होणार असा सवाल अण्णांनी केलाय. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी खोटं बोलतायत असा आरोपही अण्णांनी केली. दरम्यान, अण्णांना समर्थन देण्यासाठी आज राळेगणमध्ये 5 वाजेपर्यंत सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले.
अण्णांची प्रकृती व्यवस्थित राहावी, यासाठी पुण्याहून ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं विशेष पथक राळेगणमध्ये दाखल झालंय. तर भाजप नेते अरुण जेटली यांनी अण्णांना पत्र पाठवून अण्णांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आपण मदत करू, असं आश्वासन जेटलींनी या पत्रातून अण्णांना दिलंय.