11 डिसेंबर : जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज अण्णांची भेट घेतली.
तर अण्णांना समर्थन देण्यासाठी राळेगणमध्ये 5 वाजेपर्यंत सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अण्णांची प्रकृती व्यवस्थित राहावी, यासाठी पुण्याहून ससून हॉस्पिटलच्या डॉक्टारांचं विशेष पथक राळेगणमध्ये दाखल झालंय.
ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले स्वत: अण्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. यादवबाबा मंदिरातील एका खोलीत तातडीची वैद्यकीय सेवा पुरवणारा सुसज्ज असा कक्षही उभारण्यात आला आहे.