आव्हाडांच्या 'आदर्श' फ्लॅटची चौकशी करा :कोर्ट

आव्हाडांच्या 'आदर्श' फ्लॅटची चौकशी करा :कोर्ट

  • Share this:

jitendra awadha10 डिसेंबर : बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल याच हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे असं सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या आदर्श सोसायटीतल्या फ्लॅटची चौकशी करा, असे आदेश ठाणे कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

आव्हाड यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आदर्शतल्या फ्लॅटचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी ही माहिती लपवलीये त्याबाबत माहिती उघड करावी, अशी मागणी करणारी याचिका प्रविण वाटेगावकर यांनी ठाणे कोर्टात दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत, ठाणे कोर्टाने हे आदेश दिले आहे.

First published: December 10, 2013, 7:27 PM IST

ताज्या बातम्या