दाभोलकर होते सरकारचे दलाल, रावतेंनी उधळली मुक्ताफळं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2013 05:00 PM IST

दाभोलकर होते सरकारचे दलाल, रावतेंनी उधळली मुक्ताफळं

divakar ravate10 डिसेंबर : जादूटोणाविरोधी विधेयकावरून शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी मुक्ताफळं उधळली. एखाद्या विधेयकासाठी सरकारला दलालांची मदत घ्यावी लागते. यात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नंबर एकचे दलाल होते असं वादग्रस्त वक्तव्य रावते यांनी केलंय.

रावते एवढ्यावर थांबले नाही, 'कोणतही विधेयक सरकार बनवत असते आणि विधी खात्याच्या मान्यतेनुसार कायदेशीर अडचणी येऊ नये हे पाहिलं जातं. मात्र महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडलंय. एखादा कायदा आणण्यासाठी सरकारला दलालाची मदत घ्यावी लागते. पहिले नंबर एकचे दलाल होते नरेंद्र दाभोलकर. दुर्देवाने ते गेले ती दुखद घटना आहे. मात्र त्यांच्या मृत्यूपश्चात श्याम मानव फडफडत उठले. राज्यभर तुम्हाला काय हवं अशी विचारणा करत आहे, श्याम मानव सरकारचे दलाल आहे का? अशी मुक्ताफळं रावते यांनी उधळली.

त्यांच्या या विधानांचा सर्व स्तरांतून निषेध सुरू आहे. सामाजिक कार्यासाठी दाभोलकर यांनी लढा दिला म्हणून ते आमच्यासाठी दलाल होते. जर कुणी दाभोलकर यांच्यावर अशा अर्वाच्च भाषेत टीका करत असेल तर अप्रत्यक्षपणे ते दाभोलकरांच्या खुनाला जबाबदार आहे असं म्हणावं लागेल असं प्रतिउत्तर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिलं. विशेष म्हणजे शिवसेनेनं जादुटोणा विरोधी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. हे माझ्या आजोबांचं प्रबोधनकारांच्या विचारांचं विधेयक असल्याचं खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं श्याम मानव यांनी सांगितलं. रावते यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2013 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...