इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानी सह तिघांना जन्मठेप !

इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानी सह तिघांना जन्मठेप !

  • Share this:

kalani 03 डिसेंबर : उल्हासनगरमध्ये २३ वर्षांपूर्वी झालेल्या इंदर भटिजा यांच्या हत्येप्रकरणी उल्हासनगरचे माजी आमदार व नगरसेवक सुरेश ऊर्फ पप्पू कलानीसह चौघांना जन्मठेप आणि 5 हजारांचा दंडची शिक्षा सुनावली आहे.

२७ एप्रिल १९९० रोजी कामावर जात असताना इंदर भटिजा यांची त्यांच्या अंगरक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पप्पू कलानी, आणखीन तिघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरपूर्वी हा खटला संपविण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाला दिले होते. रिचर्ड, डॉ. नरेंद्र यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्ह्य़ाचा कट, खून आदी आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले. २३ वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया भटिजा यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

 

First published: December 3, 2013, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading