ऊस पेटला, राज्यात 48 तास बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऊस पेटला, राज्यात 48 तास बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • Share this:

oos jalpol28 नोव्हेंबर : ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झालं. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यापारीही बंदमध्ये सहभागी झाले आहेत. पण, त्याचवेळी आंदोलक आक्रमक झाल्यामुळे काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.

आंदोलकांनी विशेषतः एसटी बसला लक्ष्य केल्यामुळे कोल्हापूर, कराड या ठिकाणी एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्यात. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. तसंच आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवलेत वाहतुकीमध्येही अडथळे निर्मान केले आहेत. मुंबई-रत्नागिरी हा राज्य महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला आंदोलनाचा फटका बसला आहे. मुंबई-रत्नागिरी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज गुरूवारी वसगडे गावामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर आघाडी सरकारच्या पुतळ्याला चौकात फाशी दिली.वसगडे गावात सहा तासाहुन अधिक रास्ता रोको आंदोलन करुन सांगली वसगडे मार्गावरची वाहतुक ठप्प करण्यात आली. तसच विटा कराड मार्गावर आंबेगावजवळ रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नांद्रे आणि वसगडे,कर्नाळ,गोटखिंडी, गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातही शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन केले आहे. शिराळा इथे रत्नागिरी राज्यमार्गावर आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे इथली वहातूक ठप्प झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला आहे.

First published: November 28, 2013, 2:36 PM IST

ताज्या बातम्या