बीडचे जिल्हाधिकारी केंद्रेकर यांची पुन्हा बदली

बीडचे जिल्हाधिकारी केंद्रेकर यांची पुन्हा बदली

  • Share this:

sunil new28 नोव्हेंबर : बीडचे 'दबंग' जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची 16 महिन्यांतच आज गुरूवारी पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. या बदलीमागे राजकारण असल्याचा आरोप होतो आहे.

 

नवलकिशोर राम हे आता बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील. नवल किशोर राम हे यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ होते. सुनील केंद्रेकर यांनी आपला कार्यभार राम यांच्याकडे सोपावून आपल्या नवी जबाबदारी स्विकारण्यासाठी औरंगाबादकडे निघाले आहेत.

 

एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला पुन्हा एकदा राजकारणाला बळी पडावं लागलं आहे. केंद्रेकर यांच्या बदलीच्या विरोधात उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीही केंद्रेकरांची बदली करण्यात आली होती, पण नागरिकांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर ही बदली रद्द करण्यात आली होती.

 

गेल्या वर्षीच्या जूनमध्ये सुनील केंद्रेकर यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती कराण्यात आली होती.  शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष केंद्रेकर यांच्यामुळे जिल्ह्यातील कारभार पारदर्शक झाला. जनतेच्या तक्रारींवर वेळीच कारवाई होऊ लागल्याने बीडमधील नागरिक केंद्रेकर यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

 

केंद्रेकरांवर नेत्यांची नाराजी कशासाठी?

- माजलगाव महामार्गावरील अतिक्रमणं हटवली

- महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंकींच्या समर्थकांची अतिक्रमणं

- चारा छावण्या शासकीय नियमानुसार चालवण्यावर भर

- त्यामुळे आष्टीचे आमदार सुरेश धस नाराज, अजित पवारांकडे बदलीची मागणी

- शासकीय टँकरनं पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर भर

- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभाथीर्ंना थेट मदतीसाठी कार्यवाही

- स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई

 

केंद्रेकर यांच्या कारकिर्दीवर एक नजर

- 3 जून 2012 रोजी बीड इथं जिल्हाधिकारी म्हणून रुजू

- औरंगाबादमध्ये सहाय्यक विक्रीकर अधिकारी होते

- स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणांमध्ये उल्लेखनीय कारवाई

- बीड जिल्हा प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला

- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार

 

First published: November 28, 2013, 12:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading