खारघर ग्रामपंचायतीची निवडणूक ढकलली पुढे

खारघर ग्रामपंचायतीची निवडणूक ढकलली पुढे

  • Share this:

kharghar27 नोव्हेंबर : नवी मुंबईच्या खारघरमधल्या ग्राम पंचायतीची निवडणूक वादात सापडली आहे. मतदार याद्यांमधल्या घोळामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. खारघर, बेलपाडा आणि कोपरा या तीन गावांमध्ये मतदार यादीत घोळ झाल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय.

त्याचबरोबर इथं स्थानिक गावकरी विरुद्ध नंतर आलेले शहरी नागरिक यांच्यात असा वाद निर्माण झालाय. या संघर्षातूनच नागरिकांनी स्थानिकांविरोधात निवडणूक लढवण्याचं ठरवून 'खारघर कॉलनी फोरम' ची स्थापना केली आहे. विभागातल्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचं फोरमकडून सांगण्यात येतंय.

आतापर्यंत स्थानिकांचं वर्चस्व असलेल्या या निवडणुकांत काँग्रेस आणि शेकाप आघाडीवर आहे.. पण त्यांना टक्कर देण्यासाठी सजग नागरिकांनी खारघर कॉलनी फोरमची स्थापना केलीये. पण आता निवडणूक आयोगानं सध्या घोषीत केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करून नव्यानं मतदार याद्या निश्चित केल्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे स्थानिक नेत्यांना यामुळे मोठी चपराक बसली आहे.

First published: November 27, 2013, 10:14 PM IST

ताज्या बातम्या