शिवरायांच्या स्मारकाच्या वाटेत विघ्न !

शिवरायांच्या स्मारकाच्या वाटेत विघ्न !

  • Share this:

shiv smarak27 नोव्हेंबर : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक रखडण्याची चिन्हं दिसत आहे. शिवाजी महाराजांच्या या स्मारकासाठी अजूनही 13 सर्व्हे करावे लागणार आहेत. हा सर्व्हे पूर्ण करायला अजून 7 ते 8 महिने लागणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलंय.

शिवरायांचं स्मारक हे अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण मंजुरीसाठी आता प्रस्ताव पाठवणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आराखडा तयार होणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे जून महिन्यात हे स्मारक बांधण्यासाठी सीआरझेडा 4 च्या अंतर्गत केंद्र सरकारनं तत्वत: मान्यता दिलीय.

यातली पहिली परवानगीही मिळाली. तर केंद्र सरकारकडून अजून 40 परवानग्या मिळणं बाकी आहे. शिवाजी स्मारक सीआरझेडमध्ये आहे आणि त्यामध्ये कोणताही भराव किंवा बांधकाम करता येणार नाही. मुख्य म्हणजे सीआरझेड 4 मध्ये अशा प्रकारची परवानगी भारतात पहिल्यांदाच कोणत्याही प्रकल्पाला परवानगी मिळाली.

 

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईपासून साधारणत:दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य असा 309 फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्मारकामध्ये अद्ययावत वस्तुसंग्रहालय, उपहारगृह, ऍम्फि थिएटर, मोठा बगीचा, 2 हेलिपॅड, एक्झिबिशन सेंटर असा सर्व सोईसुविधा असणार आहेत.

 

थायलंडचं बेसले डिझाईन स्टुडिओ आणि मुंबईच्या टीम वन आर्किटेक्ट या दोन कंपन्यांच्या संकल्पनेतून हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुरूवातीला राज्यसरकारने 350 कोटींची तरतूद केली आहे.

First published: November 27, 2013, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading