25 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यासाठी भारतीय टीमची आज घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून दुखापती आणि खराब फॉर्ममुळे टीममधून डच्चू मिळालेल्या झहीर खानने टेस्टसाठी कमबॅक केलंय तर ओपनर गौतम गंभीरच्या नावाचा मात्र विचार करण्यात आलेला नाही.
मात्र युवा खेळाडू अंबाती रायडूला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आलीय. तर मुंबईकर अजिंक्य रहाणेनंही टीममध्ये आपली जागा कायम राखली आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत 3 वनडे आणि दोन कसोटीसाठी भारतीय टीमची आज बडोद्यात घोषणा झाली.
बडोद्यामध्ये भारतीय निवड समितीच्या बैठकीत 16 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यात भारतीय संघ 5, 8 आणि 11 डिसेंबर रोजी तीन वनडे सामने खेळणार आहे. तर 18 ते 22 डिसेंबर आणि 26 ते 30 डिसेंबर दरम्यान कसोटी सामने खेळवण्यात येतील.
अशी आहे वनडे टीम
महेंद्र सिंग धोणी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, आर.अश्विन, अंबाती रायडू, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी, उमेश यादव, ईशांत शर्मा, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, अमीत मिश्रा.
अशी आहे टेस्ट टीम
महेंद्र सिंग धोणी (कर्णधार), शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, आर.अश्विन, अंबाती रायडू, मुरली विजय, रिद्धमान सहा, झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी, उमेश यादव, ईशांत शर्मा, रवींद्र जडेजा, प्रज्ञान ओझा.