ऊस दरवाढीचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारी

ऊस दरवाढीचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारी

  • Share this:

cane prots25 नोव्हेंबर : ऊस दरवाढीचा प्रश्नावर चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच आहे मात्र यावर राज्यपातळीवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता उसाचा प्रश्न पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दरबारी सुटण्याची शक्यता आहे.

आज सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये बैठक झाली. पण या बैठकीतही कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता उद्या मंगळवारी मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत.

उसाला 3000 रु. दर हवा या मागणीवर राजू शेट्टी ठाम आहेत. 27 तारखेपर्यंत आम्ही याबद्दलच्या निर्णयाची वाट बघू, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. एकूणच उसाच्या आंदोलनाचा हा प्रश्न आता राज्यपातळीवर सुटू शकत नाही. दरम्यान, कराडमधल्या सरपंच परिषदेत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, दोन महिलांनी उभं राहुन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता, पोलिसांनी 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

First published: November 25, 2013, 7:43 PM IST

ताज्या बातम्या