बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पवारांचा पुढाकार

  • Share this:

Image pawar_300x255.jpg18 नोव्हेंबर :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतिदिन रविवारी पार पडला. मात्र गेल्या वर्षभरापासून बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. आज शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आणि त्यांच्याशी स्मारकाच्या विषयावर चर्चा केली. शरद पवारांनीही तातडीने 'ऍक्शन' घेत स्मारकाच्या कामाला लागले आहे.

पवार यांनी संध्याकाळी दादरच्या महापौर बंगल्याची पाहणी केली. महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेबांचं भव्य असं स्मारक व्हावं असा प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आलाय. शिवसेनेच्या नेत्यांनी सकाळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी आर्किटेक्ट शशी प्रभूही उपस्थित होते.प्रभू यांच्याकडून तांत्रिक बाबी ही पवारांनी समजून घेतल्यात. आणि संध्याकाळी थेट महापौर बंगल्याला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते हजर होते.

गेल्या वर्षभरात शिवसेनेनं बाळासाहेबांच्या स्मारकासाठी लढा दिला. बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनी स्मारक उभारण्याची शक्यता सेनेकडून होती मात्र तसं काही झालं नाही. शिवाजी पार्कवर बांधकाम विरहीत असा मातीचा चौथरा आणि बगीचा तयार करण्यात आलाय. मात्र बाळासाहेबांच्या कायमस्वरुपी भव्य स्मारकासाठी सेनेचा लढा अजूनही कायम आहे आज यासाठी सेना नेत्यांनी बाळासाहेबांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडं घातलंय.

हे पण वाचा - ‘ही दोस्ती तुटायची नाय..’ (हेडलाईनवर क्लिक करा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2013 08:23 PM IST

ताज्या बातम्या