शालेय अभ्यासक्रमात लवकरच सचिनचा धडा

शालेय अभ्यासक्रमात लवकरच सचिनचा धडा

  • Share this:

sachin by more18 नोव्हेंबर : तब्बल दोन दशकं क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या सचिनने शनिवारी क्रिकेट जगताला अलविदा केला. पण आपला सचिन आता आपल्याला शालेय पुस्तकातून भेटीला येणार आहे. शालेय अभ्यासक्रमात आता सचिनचा धडा घेतला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिलीये.

सचिनची 24 वर्षांची थक्क करणारी कारकीर्द शालेय अभ्यासक्रमात असणार आहे. सचिन एक खेळाडूच नाही तर एक चांगला माणूस म्हणूनही त्याची ओळख आहे. सचिनची खेळी, त्याचं सामाजिक कार्यातील योगदान, ध्येयनिष्ठा अशा अनेक गोष्टीने सर्वसपूर्ण सचिनचा धडा शालेय विद्यार्थांना बालकडूच ठरणार आहे.

मात्र या धड्याचं स्वरूप कसं राहिल याची जबाबदारी अभ्यास मंडळाला देण्यात आली आहे. मुलांना सचिनपासून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचंही दर्डा यांनी सांगितलं. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आधी भारतरत्नच्या रुपानं सुखद धक्का मिळाला. राज्य सरकारनंही सचिनप्रेमींना आनंद होईल असा निर्णय घेतलाय.

First published: November 18, 2013, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading